Ad will apear here
Next
खामकर यांना ‘मसाप’चा पुरस्कार जाहीर
शांताराम खामकरपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा कवी यशवंत स्मृती पुरस्कार या वर्षी ‘भवताल’ या कवितासंग्रहासाठी कवी शांताराम खामकर ऊर्फ श्याम यांना जाहीर झाला आहे. एक हजार रुपये आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वप्नील पोरे आणि प्रभा सोनवणे यांच्या निवड समितीने या पुरस्कारासाठी ग्रंथाची निवड केली.

हा पुरस्कार प्रदान समारंभ नऊ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रेखा इनामदार-साने यांच्या हस्ते आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे, अशी माहिती कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.

कार्यक्रमाविषयी :

दिवस : शुक्रवार, नऊ मार्च २०१८
वेळ : सायंकाळी ६.३०
स्थळ : माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZVMBM
Similar Posts
‘विषयावरून कवितेचे श्रेष्ठत्व ठरत नाही’ पुणे : ‘कवितेला कोणताही विषय वर्ज्य नाही. गुलाबाच्या फुलावर कविता केली, म्हणून ती दुय्यम ठरत नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कविता केली म्हणून ती श्रेष्ठ ठरत नाही. विषयावरून कवितेचे श्रेष्ठत्व ठरत नाही,’ असे मत ज्येष्ठ समीक्षक प्रा. रेखा इनामदार-साने यांनी व्यक्त केले. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’तर्फे
‘मसाप’चा रेखा ढोले पुरस्कार जाहीर पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजहंस’च्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या श्रीमती रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मसाप’तर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. या वर्षी मराठी
‘संगीतामुळे दृष्टी सौंदर्यमयी होते’ पुणे : ‘माणूस सर्व कला शिकतो तेव्हा त्याला सौंदर्यदृष्टी येते; पण संगीत शिकतो तेव्हा दृष्टीच सौंदर्यमयी होते. नाटक हे करणाऱ्याच्या मनात असावे लागते. ते नसेल तर नाटकातील गाणे सुरेल होऊ शकत नाही. कारण, नाटकात गाणे हे सोपे काम नाही. संगीत नाटकातले गद्यही सुरात म्हणावे लागते. सूर असतील तरच नाटक यशस्वी होते,’
‘मसाप’तर्फे ३० जुलै रोजी ‘लेखक तुमच्या भेटीला’ पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन आणि मीरा शिंदे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार दि. ३० जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language